दिवाळी

दिवाळी हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री वाटे धुके असावे गंधाळले सकाळी मी एकटा असावे बोलु नये कुणाशी सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा मारू नयेत हाका आता कुणी अवेळी आशुतोष 

Follow

Get every new post delivered to your Inbox.