कविता हा काळोखाचा रस्ता आपुला नाही ही चिमणपाखरे तुझ्याविना, त्या दुनिया माहित नाही हा काळोखाचा रस्ता आपुला नाही दुष्काळ किती वर्षानुवर्षं आलेले इतिहास बघा, उद्ध्वस्त सर्व झालेले तरी हाती घेऊन नांगर बळिवंतांनी कोरड्या भुईतून स्वर्ग उभे केलेले येऊ दे किती दुष्काळ, कर्ज दुनियेचे नवनवे शास्त्र घेऊन नव्या शेतीचे हा सुखी करू संसार, उभारु राजा आभाळ [...]
Filed under: मराठी कविता | Tagged: कविता | Leave a Comment »