काही चारोळ्या………………….

काही चारोळ्या…………………. माझा संवाद मनाशी, मन कशात गुंतले पश्चिमेच्या सावल्यांना, अंतर नाही पुरले ==================== क्षितिजाच्या रेषेवर संध्येचा लालीमा, तुझ्या आठवाने येतो गाली रक्तिमा. ==================== श्वासाश्वासाचे अंतर, माझा भक्तीचा रे भाव, फुले झाली ती निर्माल्य, कसा मिळावा पायी ठाव ======================= माझा संवाद स्वप्नांशी स्वप्न मना लावी पिसे हाय! शब्द रे मातला स्वप्न व्हावे सत्य कसे? ======================== [...]

ह्ल्ली मी भांडत नाही,

ह्ल्ली मी भांडत नाही, असा तिचा ग्रह आहे, खर सांगायचच झालं तर, माझा तिच्याशी तह आहे.

Follow

Get every new post delivered to your Inbox.