Posted on नोव्हेंबर 7, 2007 by vkudal
अशी ही दिवाळी आरती सुदाम कदम सोम, ०५/११/२००७ – ०६:२२. » प्रतिसाद देण्यासाठीदसरा झाला की पाठोपाठ हजेरी लावते ही दिवाळी आनंदाची मुक्तहस्तपणे उधळण करते ही दिवाळी आप्तजणांच्या गाठीभेटी घडवून आणते ही दिवाळी सर्वाना एकत्र जमवून प्रेम वाढवते ही दिवाळी ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी सुंदर सुंदर आकाशदिव्यानी [...]
Filed under: दिवाळी, मराठी कविता | Tagged: दिवाळी | 2 Comments »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
दिवाळी हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री वाटे धुके असावे गंधाळले सकाळी मी एकटा असावे बोलु नये कुणाशी सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा मारू नयेत हाका आता कुणी अवेळी आशुतोष
Filed under: गझल, दिवाळी, मराठी कविता | Tagged: दिवाळी गझल | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
मन……………. संवाद तुटत चाललाय,मना मनातला. कल्लोळ होतोय भावनांचा, मना मनातल्या. कुठे जावे कळत नाही या मनाला. शेवटी आपल्याच पायात घुटमळते आहे घेत शोध मनातल्या मनाचा. मन एक वसन, धारण केलेलं मिरवायचं तरी किती? फ़ेकुन द्याव वाटल तरी संभाळाव किती? मन नाजुकसा हार, जणु गुंफ़लेली मोत्याची माळ तुटली जर ती तर जोडावी कशी? मनात उरलाय फ़क्त [...]
Filed under: मराठी कविता | 3 Comments »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
मी असा कसा? रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा? रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ? नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो, रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ? प्रेम खरे जरी मी शोधतो, रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ? पदरी आहे जरी निराशा, रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा [...]
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | 2 Comments »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
ह्ल्ली मी भांडत नाही, असा तिचा ग्रह आहे, खर सांगायचच झालं तर, माझा तिच्याशी तह आहे.
Filed under: मराठी कविता, charoli | Tagged: charoli | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
कविता हा काळोखाचा रस्ता आपुला नाही ही चिमणपाखरे तुझ्याविना, त्या दुनिया माहित नाही हा काळोखाचा रस्ता आपुला नाही दुष्काळ किती वर्षानुवर्षं आलेले इतिहास बघा, उद्ध्वस्त सर्व झालेले तरी हाती घेऊन नांगर बळिवंतांनी कोरड्या भुईतून स्वर्ग उभे केलेले येऊ दे किती दुष्काळ, कर्ज दुनियेचे नवनवे शास्त्र घेऊन नव्या शेतीचे हा सुखी करू संसार, उभारु राजा आभाळ [...]
Filed under: मराठी कविता | Tagged: कविता | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
संपत आला प्रवास माझा, नावाड्या ने पार मला खूप उन्हाची वाट चालले, दे माझा अंधार मला फुकट आणसी, मोफत नेसी, दाम मागसी जगण्याचे खिसे रिकमे करून जायचा कळला ना व्यवहार मला पार्थिवतेचे तोडून बंधन उत्कटतेने मिठीत घे जिवाशिवाची भेट घडू दे, देह जाहला भार मला मनोमनी मी तुलाच वरले, नेई कृतान्ता हरुन मला जगण्याशी हा [...]
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
मन वेडं …… आज सारखं राहून राहून वाटतंय मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय… खिडकीत आलं एक अवखळ पान कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान अनामिक त्या सुगंधाच्या भासाने सारं अंग अंग शहारतंय अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय… एक मैत्रीण त्यास हवी चिडवून भांडायला रुसवून मनवायला सदोदित सोबतीला त्या धुंद चांदरातीला स्वप्न हे पूर्ण [...]
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती | जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती || मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले | जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले || मी म्हणालो, काय रे बाबांनो… कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? | आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? [...]
Filed under: मराठी कविता, हास्यकविता ... | Tagged: हास्यकविता ... | 14 Comments »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
आकाशभर आभाळ डोळाभर साचल्यावर, किंचित ओल्या पापण्या थरथर कापल्या ! कापलेल्या पापण्यांमध्ये ओले ढग विरघळले नि सुखाच्या सरी सररर धावल्या…! ……….. चक्रवर्ती
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 5, 2007 by vkudal
रामाला वाटलं नव्हतं………. रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील रामाला वाटलं नव्हतं….. रामाला वाटलं नव्हतं वनवासात रावण सितेचे अपहरण करिल तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील [...]
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | 2 Comments »