हास्यकविता …


नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती |
जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती ||
मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||

मी म्हणालो, काय रे बाबांनो… कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |
आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||
( तेवढ्यात एक गाढव मला म्हणाले…)
अगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय नाय |
माणुसच एक जोक आहे, मग शो बघण्याची गरजच काय? ||
कारण हल्लीची माणसं फक्त दिसायलाच माणुस दिसतात |
वरुन किर्तन, आतुन तमाशा, अशा प्रकारे वागतात ||

सुखाच्या मागे धावता धावता विवेक पडतो यांचा गहाण |
पाण्यात राहुनही माशाची भागत नाही जशी तहान ||
पैशाच्या मागे धावता धावता दमछाक होते यांची खुप |
वाटी वाटीने ओतले तरीही कमीच पडते यांना तुप ||

बायका आणि पोरांसाठी, चाले म्हणे हा खेळ |
ज्या देवाने घडवले यांना, त्या देवासाठी नसतो यांना वेळ ||
माण्सांच वागणं सरड्यासारखं, नेहमीच बदलत राहतं |
माणसांपेक्षा आज इमानदार गाढव, असं उदाहरण द्यावं लागतं ||

आम्ही गाढव, आम्ही गाढव आता अभिमानाने हे सांगतो |
म्हणुन तर माणुस दिसताच, खुप जोरजोरात हसतो ||
त्यांनी म्हटलं, मला पटलं, मी तिथुन निघुन जाणच बरं समजलं!

आता तरी विचार करा, आणि माणसासारखा व्यवहार करा!

14 प्रतिसाद

  1. hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  2. i realy like tgis poam . we can forget our original behaviour . now days this is real condition.

  3. I am a regular readerof ur lit’re ..
    I like it very much…
    I like ur kathakathan of genetation & karanji

  4. Wohhhhhhhhhhhhhhhh,,,, it`s very interesting & nice.

  5. khupach chhan kavita aahe

    Kunalahi gadhav mhanatana
    hi kavita mi aathaven
    mala kuni gadhav mhatala tar
    tyana hi kavita pathaven

    Umesh

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.