डोन उवाच
एखादी गोष्ट आपल्याला मागूणही देव देत नसतो तेव्हा
1) आपण अजुन त्या गोष्टी साठी तयार नसतो
2) वेळ आलेली नसते
3) आपल्ल्याला अजुन चांगली गोष्ट मिळणार असते
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
डोन उवाच
एखादी गोष्ट आपल्याला मागूणही देव देत नसतो तेव्हा
1) आपण अजुन त्या गोष्टी साठी तयार नसतो
2) वेळ आलेली नसते
3) आपल्ल्याला अजुन चांगली गोष्ट मिळणार असते
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
एकटया वाटेना जाता असताना लोकांना ओ द्यावी
कोणी वळून पण नाही पहिले तर आपली वाट चालावी
डॉन उवाच
Filed under: डॉन उवाच | 3 Comments »
With big powers come great responsibilities
If we take great responsibilities we will bet big power
Because the biggest power in world is always there to watch us and take our responsibility
Filed under: डॉन उवाच | Tagged: डॉन उवाच | Leave a Comment »
डॉन उवाच
कधी कधी काही मिळवण्यास्तही सकाळी लौकर उठून फायदा नसतो
पहाट पण जागवावी लागते
Filed under: डॉन उवाच | Tagged: डॉन उवाच | Leave a Comment »
आपल्याला व आपल्या कुटुंबियांना ही दिवाळी लक्ष-लक्ष आनंदाचे दिवे प्रज्वलित करणारी होवो या शुभेच्छा! कित्येक वर्षांनी दिवाळी पूर्ण पाच दिवसांची आली आहे. ती धडाक्यात साजरी करू या.
युवा संजीवनीने दिवाळीनिमित्त एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. त्याविषयी आपल्याला येथे सविस्तर वाचता येईल.
दिवाळीसाठी परगावी निघतोय. तिथे मायाजाळाची जोडणी मिळणे अवघड आहे. त्यामुळे पुढील लेखन पुण्यास परतल्यावरच करू शकेल. तोवर तुम्ही दिवाळीच्या फराळाचा मनमुराद आस्वाद लुटा, ![]()
स्नेहांकित,
THE DON
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
|
||||||||
![]() |
|||
|
कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया’ असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.
भाऊबीजेच्या दिवशी काय करावे?
सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.
बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।।
तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.
त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.
या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.
भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.
या दिवशी यमपूजा केली जाते.
यम पूजा करण्यासाठी मंत्र
धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।
पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।
चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा
मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | १ प्रतिक्रिया »
|
||||||||
![]() |
|||
|
दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आहे.
धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. ‘सुईला छेदल्यास तिच्यातून उंट निघतो. परंतु, धनवंताला स्वर्ग मिळत नाही. या ख्रिश्चन धर्मातील म्हणीला भारतीय सहमत नाहीत. त्यांच्या दृष्टीकोनातुन श्रीमंत लोकच देवाचे लाडके असतात.
![]() |
|||
|
लक्ष्मी चंचल नाही तर मनुष्याची वृत्ती चंचल आहे. पैसा या शक्तीच्या आधारे मनुष्य देव किंवा राक्षस बनू शकतो. लक्ष्मी केवळ उपभोगाचे साधन आहे असे मानणार्या मनुष्याचे लवकरच अध:पतन होते. परंतु, तिची पूजा करून तिला परमेश्वरी प्रसाद मानणारा मनुष्य स्वत: पवित्र आणि सृष्टीलाही पवित्र बनवितो. वाममार्गाने वापरलेल्या लक्ष्मीची अलक्ष्मी होते. स्वार्थ आणि परमार्थासाठी वापरलेल्या लक्ष्मीला वित्त आणि धनलक्ष्मी असे म्हणतात. देवकार्यासाठी वापरलेली लक्ष्मी महालक्ष्मी असते.
महालक्ष्मी हत्तीवर बसून सजून येते. हत्ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारपणे लक्ष्मीचा वापर करणार्यांजवळ पिढ्यान-पिढ्या ती राहते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रघुवंश होय. ती एक महान शक्ती असल्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या हातात राहिली पाहिजे. कारण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो.
नरकचतुर्थी:
नरकचतुर्थीला महाकालीची पूजा केली जाते. स्वत:च्या स्वार्थासाठी शक्ती खर्च करणारा दुर्योधन, दुसर्याच्या चरणी शक्ती ठेवणारा कर्ण आणि देवकार्यात शक्तीचे हवन करणारा अर्जुन या महाभारतातील तीन पात्रांना महर्षी व्यासांनी उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडले आहे. नरकचतुर्थीला कालचतुर्थी असेही म्हणतात. त्यामागे अशी कथा आहे की, नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचाराचे थैमान मांडले होते. त्याच्या अत्याचारापासून स्त्रियांचीदेखील सुटका झाली नव्हती. त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचा विचार केला. श्रीकृ्ष्णाच्या मदतीने सत्यभामेने नरकासूराचा वध करून स्त्रियांचा उद्धार केला. अमावस्येच्या त्या रात्री सर्व लोकांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता.
दिवाळी:
दिवाळी म्हणजे वैश्यांच्या (व्यापाऱ्यांच्या) हिशोब-वही पूजेचा दिवस! संपूर्ण वर्षाचे लेखा परिक्षण करण्याचा दिवस होय. या दिवशी मनुष्यानेही त्याच्या जीवनाचा लेखा-जोखा तयार केला पाहिजे. राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.
बलिप्रतिपदा (पाडवा):
नवीन वर्षाला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्थेला उध्वस्त करणार्या बळीचा विष्णूने पराभव केला होता. म्हणून त्याच्या स्मरणार्थ बलिप्रतिपदा साजरी केली जाते. बळी दानशूर राजा होता. या दिवशी त्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कांता आणि कनकेच्या (लक्ष्मी) मोहात आंधळा झालेला मनुष्य राक्षस बनू शकतो. म्हणून भगवान विष्णूने बळीचा पराभव करून कनक आणि कांतेकडे एका विशिष्ट नजरेने बघणार्यांना तीन दिवस उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला आहे.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीकडे पूज्य दृष्टीने पहावे. भाऊबीजेच्या दिवशी समस्त स्त्रियांकडे आई किंवा बहिणीच्या नजरेने पाहिले पाहिजे. स्त्री ही आदरणीय आहे. मोह म्हणजे अंधकार! दीपोत्सव म्हणजे अज्ञान आणि मोहाच्या खोल अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे प्रयाण करणे होय. दिवाळीला दिवे बाहेर जळतात. परंतु आपल्या मनात योग्य दीप प्रकट झाला पाहिजे. मनात अंधकार असल्यास बाहेर जळणारे दिवे निरर्थक ठरू शकतात. दीपक ज्ञानाचा प्रतीक आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी जीवन सार्थकी लावण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. नरकचतुर्थीला जीवनात नरक निर्माण करणार्या नरकासूरांचा नाश केला पाहिजे. दिवाळीच्या दिवशी ‘तमसो मां ज्योतिर्गमय’ या मंत्राची साधना करून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षाच्या दिवशी जुने भांडण विसरून शत्रूला जवळ केले पाहिजे. नवीन वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस! अशा प्रकारे समजूतदार ज्ञानाचे दिवे आपल्या मनात लावले तर आपले जीवन सदैव दीपोत्सवासारखे उजळेल.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | 2 Comments »
|
||||||||
![]() |
|||
|
भगवान धन्वंतरीच्या अवतारामागे एक ऐतिहासिक व पौराणिक कथा आहे. व आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीला वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही विशेष महत्त्व आहे. या दिवशी नविन भांडी खरेदी केली जातात. जे घरात धनाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. या प्रकारे धनत्रयोदशीचा संबंध धनाशी जोडला जातो. दिवाळीत धनत्रयोदशीनंतर दोनच दिवसांनी लक्ष्मीपूजन केले जाते.
समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने प्राप्त झाली होते त्यात धन्वंतरीचाही समावेश होतो. धन्वंतरीला भगवान विष्णूचा अंश मानले जाते. त्यांचे स्वरूप चतुर्भुजात्मक आहे. हे ‘भगवान’ शब्दाशी संबंधित आहे. धन्वंतरी आयुर्वेद प्रवर्तक, आरोग्य देवता मानली जाते. धन्वंतरी खर्या अर्थाने जनकल्याण करणारे, मंगल करणारे, रोगमुक्त करणारे, जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करणारे आहेत.
![]() |
|||
|
दिवाळी येण्यापूर्वीच कार्तिक मासाच्या सुरूवातीलाच सार्वजनिक स्वच्छतेला प्रारंभ होतो. वर्षभर साचलेला कचरा काढला जातो. घराला रंग दिला जातो, स्वच्छता केली जाते. घरातील सामान व्यवस्थित लावले जाते. सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. यासारखी स्वच्छता इतर कोणत्याही सणासाठी केली जात नाही. धन्वंतरीच्या उपदेशांना मूर्तरूप देण्याचा हाच खरा मार्ग होय.
प्रसन्न व पवित्र वातावरणातच देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला चांगले फळ देतो व आपली मनोकामना पूर्ण करतो. म्हणूनच धनत्रयोदशीचा संबंध फक्त धनाशीच नाही तर आयुर्रारोग्य देणार्या धन्वंतरीशी आहे. धन्वंतरीने आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला. परंतु, अवतरणानंतर आपला उद्देश पूर्ण न होऊ शकल्यामुळे त्यांनी मृत्यूलोकात जन्म घेऊन आपला उद्देश पूर्ण केला. विष्णू पुराणात शल्य चिकित्सेत आचार्यांच्या रूपात धन्वंतरीचा उल्लेख मिळतो. द्वापार युगात काशीचा राजा काश यांच्या वंशात त्यांनी जन्म घेतला. ध्वनंतरी चंद्रवंशी होता व काशीचा राजा दीर्घतम यांचा पुत्र होता, असेही मानले जाते. गरूड पुराण, विष्णूपुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण, भागवत यातही धन्वंतरीचा उल्लेख सापडतो.
काशीच्या राजाच्या वंश परंपरेत द्वापार युगातील द्वितीय भागातील काशीराज ‘धन्व’ याने पुत्रासाठी तप केले होते. या तपाने त्यांना सर्वरोगनाशक पुत्र झाला. तोही धन्वंतरी या नावाने ओळखला जातो. याच वंशात धन्वंतरीचे पुत्र केतुमान, केतुमानाचे पुत्र भीमस्थ व भीमस्थाचा पुत्र दिवोदास यांचा जन्म झाला. ह्या सगळ्यांनीच काशीचे राजपद सांभाळले. काशीराज दिवोदास अष्टांग आयुर्वेदाचे जाणकार होते.समुद्र मंथनामुळे अवतरलेल्या धन्वंतरीने दिवोदासच्या रूपात जन्म घेऊन शिष्यांना शल्यतंत्र प्रधान अष्टांग आयुर्वेदाचा उपदेश दिला होता.
![]() |
|||
|
या संदर्भात काशीराज दिवोदास यांनी सुश्रुत वगैरे शिष्यांना आयुर्वेदाचा उपदेश देतांना आपल्या विषयाबद्दल सांगितले की,
‘अहं हि धन्वंतरिरादिदेवो जरारूजामृत्युहरोहरोऽमराणाम्। शल्यांगमगैरपरैरूपेतं प्राप्तोऽस्मि गां भूय इहोपदेस्टुम्।।
म्हणजेच ‘मीच धन्वंतरी आहे. देवतांच्या वृध्दावस्था, रोग व मृत्यूचा नाश करणारा आहे. आता मी परत धरतीवर शल्यतंत्र वगैरेंचा आठही अंगांसहित आयुर्वेदाचा उपदेश देण्यासाठी आलो आहे. त्यांनीच शल्यतंत्र प्रधान आयुर्वेदाचा उपदेश दिला होता कदाचित म्हणूनच ते दिवोदास धन्वंतरी नावाने प्रसिध्द झाले. धन्वंतरी शब्दाच्या उत्पत्तीनुसार ‘धनु:शल्यं तरूयान्तं पारमियर्ति गच्छतीती धन्यंतरि’ म्हणजेच धनुचा अर्थ शल्य(शल्यशास्त्र) म्हणजेच जो शल्यशास्त्राच्या विषयात पारंगत आहे तो धन्वंतरी या नावाने ओळखला जातो.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »
|
||||||||
![]() |
|||
|
कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?
भगवान धनवंतरीची पूजा करा.
घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.
सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.
कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.
धनत्रयोदशी पूजेत काय करावे.
अ)कुबेर पूजन
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.
संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा.
कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.
”श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.”
खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।’
नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.
ब) यम दीपदान
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.
गंध, पुष्प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.
‘मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।’
आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.
यमराज पूजन
या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | १ प्रतिक्रिया »
|
||||||||
![]() |
|||
|
शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।।
दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:।
दीपो हस्तु में पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते।।
‘हे दीप ज्योती! तू जगाचे कल्याण, आरोग्य व धनसंपदा आणि वाईट विचारांचा सर्वनाश करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो! हे दीप ज्योती! तू आमच्यासाठी परब्रह्म, जनार्दन आणि पापे दूर करणारी आहेस. तुला माझा नमस्कार!’
अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाशाचे आगमन होते तेव्हा अंधार दूर होतो. अंधार दूर झाल्यानंतर तेथे मांगल्य, शुभ, आरोग्य व धनसंपदा निवास करते. वाईट विचार करत असलेल्या शत्रुची बुद्धी कुंठीत करण्याचे काम प्रकाश करतो. मनुष्याच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, मद या गोष्टींनी आपले घर पक्के केले आहे. मनुष्याच्या जीवनात प्रकाश असल्यावर ज्ञानरूपी दिवे प्रकटतात आणि ते सर्व संकटाना दूर करतात. मनुष्याचे अज्ञान हे त्याच्या पापाचे मुख्य कारण असून त्याला दूर करण्याचे काम दीपक करतो. आपले जीवन प्रकाशमय करून अंधकारमय अज्ञान दूर करतो.
आजच्या विज्ञान युगात विद्युत शक्तीने प्रकाश निर्माण केला आहे. त्यामुळे एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला दिवा लावून त्याला नमस्कार करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे वाटते. पुराणकाळात विजेचा अभाव असल्यामुळे दिवा प्रज्वलित करून त्याला स्थिर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जात असे. कारण दिवा विझून गेला तर चालू असलेले कार्य मध्येच बंद पडण्याची भीती लोकांना वाटत असे. परंतु, आज त्या परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. विज्ञानामुळे मानव भौतिक विकासाच्या शिखरावर जाऊन बसला आहे. म्हणून त्याला दिव्याची प्रशंसा करण्याची गरज वाटत नाही. उजव्या पायाच्या अंगठ्याने बटण दाबल्याबरोबर प्रकाश पडतो मग दिव्याला नमस्कार का म्हणून करायचा? असा विचार मनुष्य करू लागला आहे. परंतु, अशी कल्पना बाळगणे चुकीचे आहे.
![]() |
|||
|
आपल्या पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिलेले आहे, त्यामागे कृतज्ञतेची भावना आहे. विजेच्या या युगात तुपाने भरलेला दिवा लावून त्याला नमस्कार करण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. दिवा अंधाराभोवती तेजाचे वलय निर्माण करतो. याउलट विजेच्या अधिक प्रकाशामुळे मनुष्याचे डोळे दिपतात. दिवा मानवाला आपल्या मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो. त्यामुळे मनुष्य अंतर्मुख बनतो. तर विजेचा प्रकाश बाह्य विश्वाला प्रकाशित करून मानवाला बहिर्मुख बनवून त्याच्या अशांतीचे कारण सांगतो. एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाशित करू शकतो. एक विजेचा दिवा दुसर्या विजेच्या दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही. म्हणून दिवा आणि त्याच्या ज्योतीचे विशेष महत्त्व आहे.
आपण स्वत: प्रकाशित होऊन दुसर्यालाही प्रकाश देण्याची प्रेरणा मनुष्याने दिव्यापासून घ्यावी. त्याने जगाला अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी आणि दैवी विचारांचा प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अखंड दिव्याप्रमाणे प्रभू कार्यात मग्न राहावे. सूर्यास्तानंतर पडणार्या अंधारापासून पृथ्वीला कोणीही वाचवू शकत नाही. सूर्याची जागाही कोणीच घेऊ शकत नाही. सूर्याप्रमाणे नेहमी जळत राहून सर्वांना प्रकाश देण्याचे काम कोणीच करू शकणार नाही.
अंधार दूर करणार्या दोन रूपयाच्या पणतीच्या दिव्याला मी का नमस्कार करू नये? जो दिवा मला अंधारात धडकण्यापासून वाचवतो, जीवनाचा रस्ता दाखवितो, त्याला मी नमस्कार करू नये? तो लहानसा दिवाही मला प्रेरणा देतो.त्याचे मूल्य दोन रूपये असले तरीही हिम्मत आणि प्रकाश देण्याची प्रेरणा त्याच्याजवळ आहे. मला प्रेरणा देणार्या या दिव्याला मी जर नमस्कार केला नाही तर माझ्यासारखा कृतघ्न दुसरा कोणीच नसेल? म्हणूनच उपनिषदात ऋषींनी देवांची प्रार्थना करताना म्हटले आहे की,
‘असतो मा सत् गमय। तमसो मा ज्योतीर्गमय।
मृत्योर्माऽमृतं गमय।।’
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | १ प्रतिक्रिया »
दिवाळी पुराण आणि इतिहासातील दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:- diwali ND ND 1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. 2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. 3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. 4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले. 5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. 6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता. 7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते. 8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. 9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता. 10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे. 11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. 12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. ‘महावीर सवंत्’ त्यांच्या दुसर्या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे. 13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. 14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. 15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. 16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. 17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | १ प्रतिक्रिया »
“झाली का दिवाळीची खरेदी?” मी चॅट वर एका मैत्रीणीला विचारत होते.
“नाही अगं अजून. पिल्लूची झाली.” ती
“तुझी कधी?? काय घेणार आहेस?” परत मी
“अगं, बहुतेक काहिच नाही… काय घेणार? सगळं भरपूर आहे
“
“डोकं, अक्कल कुठे मिळतंय का बघ. तेच कमी आहे तुझ्यात ” माझा आगाऊपणा.
“हाहाहा…..” जणू तिची याला पूर्ण मान्यता आहे.
सध्या ऑफिस, घर सगळीकडे एकच विषय आहे…दिवाळी!!! रस्त्यावरून जाता-येता दिवाळी मूड अगदी जाणवतो. रंगीबेरंगी आकाशकंदिल, पणत्या, लाईट्च्या माळा….सगळा गजबजाट! सगळी दुकाने लख्ख सजवलेली…. लोकांची खरेदीसाठी गर्दी. गेले कित्येक वर्ष, किंबहुना प्रत्येकच वर्षी हे अनुभवलंय. या आनंदोत्सवाला गणेशोत्सवाने सुरूवात होते आणि दिवाळीला उधाण येते. ’दसरा-दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे अगदी खरंय
पण गणपती, दिवाळी…खरं तर कुठल्याही सणाची जास्त मजा असते ती वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत!!! पूर्ण निष्काळजी जीवन…. परिस्थितीची कमी जाणीव यामुळेच कदाचित निर्भेळ आनंद घेता येतो त्या वयात. कोणाशी तुलना करावी इतकं मोठं ना विश्व असतं ना तेवढा (अति) शहाणपणा असतो. अगदी ’विचार करण” म्हणजे सुद्धा ’स्वप्न बघण’ असतं तेव्हा!!! मला तर अजूनहि माझ्या त्या वयापर्यंतचीच दिवाळी जास्त आवडते…. दिवाळी म्हणलं कि मस्त ३ आठवडे सुट्टी, उन्हाळा नसल्याने अगदी भर दुपारी देखील बाहेर उंडारण्याची आईकडून मिळणारी मोकळीक, सहकुटुंब एकत्र कपडे खरेदी, बाबांनी आणलेले खूप सारे फटाके, आईने केलेले मस्त फ़राळाचे पदार्थ…वा!!!! नुसती ऐश, दंगा-मस्ती!!
सहामाही/ वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले कि मला आनंद व्हायचा. का? तर अभ्यास झालाय आणि कधी एकदा पेपर लिहिन म्हणून नाही तर त्यानंतर मोठी सुट्टी आणि त्यात करायच्या गंमतीच्या विचारानी
मग परीक्षा सुरू झाली जस जसा एक एक पेपर होईल तसतसं मी आई-बाबांना दिवाळीत काय करायचं हे विचारून आणि सांगून वेडं करायचे. सुट्टीतला अगदी ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी ८-८.३० नंतर उठणे! सुट्टीत मी दूध पिणार नाही, मला चहाच हवा असा मग आईकडे हट्ट
बाबांना बोनस मिळायचा आणि मग आमची मस्त कपडे खरेदी व्हायची. पण हे बोनस प्रकरण मला फ़ार नंतर कळलं…. माझी आई मला कपडे कधी घ्यायचे ते इतकं बेमालूमपणे समजावून सांगायची कि माझी अगदी खात्री असायची आई म्हणते तेव्हाच बाजारात छान छान कपडे येतात आणि तेव्हाच खरेदी करायची असते. मग ’तो’ खरेदीचा दिवस यायचा…सकाळी लवकर आवरून-जेवून आम्ही खरेदीला बाहेर पडायचो. आई बाबांचे एक ठरलेलं असायचं कि आधी आम्हा भावंडांची खरेदी….मग जे राहिल आणि त्यात जे शक्य असेल ते स्वत:साठी. (त्यांचा हा त्याग कळायला तर मला बरीच वर्ष जावी लागली) खरेदी झाली कि कुठल्यातरी मस्त हॉटेलमध्ये जाऊन तुडुंब पोटोबा व्हायचा. त्यावेळी, म्हणजे अगदी १७-१८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जाणं हि चैन होती. कित्येक वर्ष मी न चुकता मसाला डोसाच खायचे! पंजाबी, पाव-भाजी वगैरे माहितच नव्ह्तं तेव्हा. डोसा, आईस्क्रिम वगैरे खाऊन पोटाने आणि मनाने तृप्तीची ढेकर देत आम्ही घरी यायचो. बाहेर खाल्लं म्हणून घरी काहिच करायचं नाही अशी सवय तेव्हाच्या आयांना नव्हती. (आता माझी पिढी जेव्हा आई झालीये तेव्हा आम्ही घरी खायला सुद्धा बाहेरचे पदार्थे आणतो!) कितीहि पोट भरलेलं असलं तरी थोडा दहिभात खाऊनच मी कित्येकदा झोपलेली आहे. त्याशिवाय सुटका नसायची. तेव्हा त्रास वाटणार्या या आग्रहात किती प्रेम, माया होती हे आज कळतं. काल केलेली कपडे खरेदी आज परत सकाळी, दुपारी काढून बघायची हि सवय तर मला अजूनहि आहे.
आई ची फराळाची तयारी चालू व्हायची….. त्यात मग मी आणि दादा जमेल तितकी लुडबूड करायचो. नुकती भाजलेली गरम गरम भाजणी खाणे हा एकदम चकली खाण्याइतका आवडता प्रकार. रव्याचा गरम लाडू म्हणजे आहा!!!! दिवाळीत माझं अगदी ठरलेलं काम म्हणजे रांगोळी रंग आणणे, ते नीट काढुन ठेवणे आणि रांगोळी साठी एक चौकोन भर काव (गेरू) लावून ठेवणे. एकदा प्रचंड उत्साहाने रांगोळीसाठी एका पेपर ला उदबत्तीने भोकं पाडून ठेवली होती. वाट्लं कि त्याने रांगोळीचे ठिपके नीट एका अंतरावर येतील. पण त्या भोकाटून रांगोळी खाली आलीच नाही
जाम पोपट!!!! वेळ तर वाया गेलाच शिवाय आईची चिडचिड झाली
दिवाळीत मोठ्या माणसांचा अजिबात हस्तक्षेप नसलेला कार्यक्रम म्हणजे किल्ला करणे! एखाद्या सकाळी दादा जाऊन कुठुन तरी माती घेऊन यायचा. मग त्यातले खडे वेगळे काढून टाकायचे. थोडी माती चाळून घ्यायची. गुहा तयार करायला एक डबा, विहिर/ तळं करायला एक हिंगाचा गोल डबा, सिंहासनाची जागा प्लेन होण्यासाठी एक फ़रशीचा तुकडा, ३-४ विटा वगैरे साहित्य आधीपासून च जमवलेलं असायचं. मला आवडायचं ते किल्ल्याच्या पायर्या करायला. गोल गोल फ़िरवत त्या पायर्या वरपर्यंत न्यायच्या…. मग २ बुरूज, भाजीवाली, गवळण यांची जागा…सगळं एकदम ठरलेलं. अगदी जमलंच तर एखादं शेत वगैरे पण! (आता जिम वगैरे पण ठेवावी लागेल
) सगळं झालं कि मग चाळ्लेल्या मातीने एक फिनिशिंग टच द्यायचा….हळीव पेरायचे कि झालं. मग त्यावर खेळणी मांडायची, पणती लावायची. हरखून जायला व्हायचं. दिवसभर मातीत खेळायला मिळायचं. इतक्या हौसेने केलेला किल्ला नंतर मात्र बॉंब लावून ऊडवून द्यायचा…. आणि वर कोणाचा किल्ला एका बॉंबमध्ये उडाला, कोंणाला २ लागले याचे चर्चा. लहानपण देगा देवा……..
बाबांनी कितीहि फटाके आणले तरी सगळ्यात आधी काय तर त्याची सम विभागणी. अगदी लवंगीच्या माळा, पानपट्टी सगळे मोजून वेगळे काढून ठेवायचो. नरक चतुर्दशीला पहिला फटाका कोणाचा याची मित्र मैत्रीणीत स्पर्धा असायची. दादा कधी कधी हातात लवंगी उडवायचा…..ती उडेपर्यंत मी नुसती ओरडत असायचे. दादा मात्र आपण फ़ार शूर असल्याचा आव आणायचा. मन्सोक्त फटाके उडवून झाले कि मग फ़ुसके फटाके शोधायचे आणि दारू करायची
फटाक्यांचे packing चे प्लास्टिक गोळा करायचा आणि ते जाळून ’शेंबूड शेंबूड’ असा गलका करायचा. प्रचंड धूराची वायर, नागगोळी…..सही असायचं सगळं. आता कितीहि फटाके आणा, ती मजा येतच नाही. ’गेले ते दिन गेले……’
आता दिवाळी म्हणजे चार दिवस वेगळं खायला काय करायचं वगैरे प्लॅन्स असतात. लहानपणी खाण्यात लक्षच नसायचं. आई खेळातून खेचून आणून खायला लावायची. आता तितकं खेळायचं म्हणलं तरी जीवावर येईल.
आता सगळं समीकरणच बदललं. सगळ्यात आधी तर वेळ नाही. आणि आजकाल सगळंच नेहमी मिळतं, आर्थिक परिस्थीती बदलली. जीवनशैली बदलली. सगळीकडेच पैसे जास्त झाले….. मग खरेदी मनात येईल तेव्हा, हॉटेल तर कधीही. माझ्या मैत्रिणीसारखा “काय घेऊ? सगळं आहे” असं असणारे लोक वाढले आहेत. फराळाचं आकर्षण पण संपलं. मुलांना खेळायला जागा नाही, आई कडे वेळ नाही….मग ते जातात ट्रेक ला, शिबिराला वगैरे. दिवाळी येते नि जाते….. पण अजूनहि मनात रेंगाळते आणि अनुभवावीशी वाट्ते ती दहावी-बारावी च्या आधीची दिवाळी!!
from http://badbadi-snehal.blogspot.com/2007/11/blog-post.html
Filed under: Uncategorized | Tagged: दिवाळी | 2 Comments »
आरती सुदाम कदम सोम, ०५/११/२००७ – ०६:२२. » प्रतिसाद देण्यासाठीदसरा झाला की पाठोपाठ
हजेरी लावते ही दिवाळी
आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी
आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी
सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
हॅपी दिवाळी
Filed under: दिवाळी, मराठी कविता | Tagged: दिवाळी | 2 Comments »
दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून – वाचनालयांतून – घरोघरी – देशी – परदेशी – रद्दीवाल्याकडे – तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे… रिसायकल होत राहतात. दुसर्या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.
’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.
तरीही… तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्या – चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्या ’मौजे’पर्यंत… धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्या ’शब्द’पर्यंत… काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’…
किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच…
या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!
Filed under: marathi, news | Tagged: diwali | Leave a Comment »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | 5 Comments »

Filed under: Uncategorized | Tagged: marathi greeting diwali | १ प्रतिक्रिया »


Filed under: Uncategorized | Tagged: marathi greeting diwali | 5 Comments »
![]() |
उजाळा कृतज्ञतेचा – स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवानिमित्त “मानव्य’ संस्थेच्या वतीने सोमवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब पटवर्धन यांच्या शनिवार वाड्याजवळील वास्तूसमोर दिवे लावून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देण्यात आला.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »

Filed under: चिंटू, हास्यचित्रे | Tagged: , चिंटू | 2 Comments »
/E6DC379D6B572D5D6525738A006F4A62/$FILE/kaaysangta1.jpg)
Filed under: हास्यचित्रे | Tagged: हास्यचित्रे | Leave a Comment »
http://karaoke.esnips.com/doc/f215d2dd-8bae-4b35-bc6d-2b05bce1241f/Amitabh
Filed under: दिवाळी, pu, va | Tagged: - व. पू. काळे, कथाकथन, va pu | Leave a Comment »
दिवाळी अंक पाठवायला सुरुवात झाली आहे आणि जसे जसे अंक रवाना होते आहेत तशी पूर्वसूचना
ईमेलने देणे सुरू आहे.
——————————————————
दिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो.
रंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे.
मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी आपला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.
३ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २०% सूट
६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ३०% सूट
अंकविक्रीची मुदत ८ नोव्हेंबर, २००७ आहे पण सर्व अंक तोपर्यंत शिल्लक असतीलच असे नाही.
अधिक माहिती
१. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल.
२. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | १ प्रतिक्रिया »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | 2 Comments »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | Leave a Comment »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | १ प्रतिक्रिया »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | 2 Comments »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | Leave a Comment »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | १ प्रतिक्रिया »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | 6 Comments »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | Leave a Comment »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | 2 Comments »

Filed under: marathi greeting diwali | Tagged: marathi greeting diwali | Leave a Comment »
फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर
फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर
कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर
किल्ला काय मांडला जाईल फक्त मुले लहान तोवर
शुभेच्छा काय वाचली जाईल फक्त पत्र मिटेस तोवर
रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर
पुजा काय केली जाईल फक्त तिथी पालटेस तोवर
ओवाळणी काय टाकली जाईल फक्त पैसा बोलतोय तोवर
दिवाळी काय साजरी होईल चार दिवस सरेस तोवर
मग ही चार दिवसांची राणी अशी कितीशी पुरणारं …
हे दिवस सरल्यावर काहीच नाही का उरणारं ?
फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर
पण डोळ्यात साठवलेली आतषबाजी तर उरेल ना
फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर
पण जिभेवर रेंगाळलेली ती चव तर उरेल ना
कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर
पण त्या कॉलर मधली ताठ मान तर उरेल ना
किल्ला काय मांडला जाईल फक्त मुले लहान तोवर
पण इतिहासातुन मिळालेली प्रेरणा तर उरेल ना
शुभेच्छा काय वाचली जाईल फक्त पत्र मिटेस तोवर
पण त्यांच्यामागे जपलेली आपुलकी तर उरेल ना
रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर
पण रेखाबद्ध जीवनातली रंगसंगती तर उरेल ना
पूजा काय केली जाईल फक्त तिथी पालटेस तोवर
पण पूजा केली त्याचं स्मरण तर उरेल ना
ओवाळणी काय टाकली जाईल फक्त पैसा बोलतोय तोवर
पण प्रेमानी बांधलेलं नाजुक नातं तर उरेल ना
दिवाळी काय साजरी होईल चार दिवस सरेस तोवर
पण चार दिवसांच्या कौतुकाची आठवण तर उरेल ना
मग ही चार दिवसांची राणी अशी कितीशी पुरणारं …
हे दिवस सरल्यावर काहीच नाही का उरणारं ?
उरेल नक्की एक नियम… काहीचं नसलं जरी सदैव उरणारं
तरी सगळं संपल्यावरसुद्धा ; असतं खुप काही उरणारं
-
योगी
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »
![]()
|
|||||
Filed under: दिवाळी | Leave a Comment »
हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी
सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी
होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री
वाटे धुके असावे गंधाळले सकाळी
मी एकटा असावे बोलु नये कुणाशी
सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी
कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा
मारू नयेत हाका आता कुणी अवेळी
Filed under: गझल, दिवाळी, मराठी कविता | Tagged: दिवाळी गझल | Leave a Comment »
योग्य शिक्षण घ्या, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा!
![]()
[ Saturday, June 16, 2007 12:35:55 am]
![]()
|
योगेश मेहेंदळे , मुंबई एकेकाळी केवळ सरकारी कंपन्या , बँका , रेल्वे , बेस्ट आणि गिरण्या असे ठराविक स्त्रोत नोकरीसाठी उपलब्ध होते. आता आयटी , रिटेल इंडस्ट्री , रियल इस्टेट , हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री , पर्यटन , औषधनिमिर्ती , वैद्यकीय क्षेत्र , खाद्य पदार्थ अशा अनेक क्षेत्रांची भर पडली आहे. विशेष म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजेस धुंडाळण्यात बेकारांचे जोडे झिजत , त्या मुंबईतील आयटी इंडस्ट्रीत जॉब अॅट्रिशन रेट (नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण) २५ ते ३० टक्के आहे. फार्मा इंडस्ट्री , रिटेल अशा क्षेत्रांतही हे प्रमाण १५ ते २० टक्क्यांच्या घरात आहे. विमान वाहतूक क्षेत्रातले बदल करीअरिस्टिक तरुणांच्या पथ्यावर पडत आहेत. मुंबई विमानतळाचा वापर वर्षाला २ कोटी प्रवासी करतात. ही संख्या २०३०मध्ये ९ कोटींच्या घरात पोचणार आहे. सुमारे ३०० नवीन विमाने कंपन्यांच्या ताफ्यात जमा होतील. प्रत्येक विमानामागे पायलट , को-पायलट , पर्सर , एअर हॉस्टेस , ग्राउंड स्टाफ आणि अन्य संलग्न सेवा अशा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माध्यमातून ५० जणांना रोजगार मिळतो. त्याशिवाय अन्य क्षेत्रांमधील रोजगारवाढीला हातभार लागतो तो वेगळाच. त्यामुळे या माध्यमातून चांगले उत्पन्न देणारा खात्रीशीर स्त्रोत निर्माण झाला आहे. भारतात सुमारे २६ कोटी घरांची कमतरता आहे. मुंबईतही १० लाख घरांचा बॅकलॉग आहे. परिणामी रियल इस्टेटमध्ये मोठ्या घडामोडी होत असून रेडीमिक्स काँक्रिट इंडस्ट्री , काँट्रॅक्टर्स , सुपरवायझर , मालवाहतूक , स्टीलसारखे धातू , बँकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होणार आहे. लाफार्ज , हुलसिन , एल अँड टी अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक बड्या कंपन्या यात आहेत. फक्त ‘ रेडिमिक्स ‘ चेच किमान ७५० प्लँट एका वर्षात उभारण्यात येणार असल्याचे ‘ रेझ्युमे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी ‘ चे गिरीष टिळक यांनी सांगितले. एकेकाळी केवळ ट्रान्सपोर्ट असे स्वरुप असलेला उद्योग लॉजिस्टिकच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रत्येक क्षेत्रासाठी माल वेळच्यावेळी पोचणे , वाहतूक सुलभ व दजेर्दार होणे , माल कुठे आहे , कसा आहे याची अद्ययावत माहिती मिळणे आदींचा समावेश असलेली ‘ लॉजिस्टिक इंडस्ट्री ‘ ही वेगाने मूळ धरत असून त्यातही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. शिवाय विमा , म्युच्युअल फंड , शेअर ब्रोकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यामुळे ‘ योग्य शिक्षण घ्या आणि अपॉइंटमेंट लेटर मिळवा ‘ अशी स्थिती तरुण पिढीसाठी निर्माण होत आहे. |
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »
अमिताभचा वाषिर्क पगार फक्त २,५०० रुपये!
![]()
[ Tuesday, November 06, 2007 12:10:27 am]
![]()
|
म. टा. व्यापार प्रतिनिधी चित्रपट आणि ब्रँडच्या जाहिरातींद्वारे कोट्यवधी रुपये मिळविणाऱ्या अमिताभ बच्चन यास मात्र एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनीचे संचालक वर्षाला फक्त २,५०० रुपये मिळत आहेत, तर याच कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमर सिंग यांचे पॅकेज ३२ लाख १० हजार रुपयांचे आहे!! एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनीचे शेअर एनएसईवर शुक्रवारी नोंदविण्यात आले. बीएसई, कोलकाता आणि बेंगळूर या शेअर बाजारांत यापूवीर्चे ते नोंदविण्यात आलेले आहेत. शेअर लिस्टिंगच्या निमित्ताने एनएसईला पुरविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बच्चन नॉन एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे १८ कोटी रुपये किमतीचे १० लाख शेअर आहेत. एकूण भागभांडवलापैकी ३.६४ टक्के हे शेअर आहेत. तर अमर सिंग आणि त्यांच्या पत्नी पंकज कुमारी सिंग नावे नऊ कोटी रुपये किमतीचे २ लाख ५० हजार एक शेअर आहेत. त्यांही संचालक असून त्यांना दहा हजार रुपये मिळतात. एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनी वीजनिमिर्ती क्षेत्रात कार्यरत असून तिचे रजिस्टर कार्यालय कर्नाटकमधील कोडागू येथे आहे. बच्चन यांना पगार देणारी ही पहिली कंपनी आहे. अमिताभ बच्चन कॉपोर्रेशन लि. (एबीसीएल) या त्यांच्या कंपनीकडून त्यांनी पगार घेतलेला नाही. शेअर बाजारास पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार जून २००५ आणि मार्च २००६ या काळात बच्चन यांचे नाव प्रमोटर्सच्या यादीत होते. परंतु नंतर ते काढून टाकण्यात आले. मार्च २००७ अखेर संपलेल्या आथिर्क वर्षात कंपनीने १० कोटी ८० लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वषीर् ६० लाख रुपयांचा नफा झालेला होता. कंपनी १९ जानेवारी १९९५ रोजी स्थापन करण्यात आलेली असून तयार करण्यात आलेली सर्व वीज कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉपोर्रेशनला विकण्याचा करार १९९९ साली करण्यात आलेला असून तो २० वषेर् मुदतीचा आह |
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »
लोकमान्य टिळकांच्या नावे पाच रुपयांची नाणी
![]()
[ Tuesday, November 06, 2007 12:07:11 am]
![]()
|
म. टा. बँकिंग प्रतिनिधी भारतीय रिर्झव्ह बँकेने लोकमान्य टिळकांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा नामोल्लेख असलेली पाच रुपयांची नवी नाणी चलनात आणली आहेत. या नाण्याच्या एका बाजूला टिळकांची प्रतिमा असून, वरच्या भागात हिंदीत ‘लोकमान्य बाल गंगाधर तिलक की १५० वी जयंती’ असे शब्द असून, खाली इंग्लिशमध्येही हेच शब्द आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह आणि सत्यमेव जयते हे शब्द आहेत. चलनात असलेल्या पाच रुपयांच्या नोटाही अर्थात कायदेशीर चलन म्हणून वापरात राहतील, असे रिर्झव्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. |
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »

Filed under: मराठी कविता, हसा लेको, marathi | Leave a Comment »

Filed under: हसा लेको | Tagged: हसा लेको | १ प्रतिक्रिया »

Filed under: हसा लेको | Tagged: हसा लेको | 5 Comments »
काहीतरी भव्यदिव्य करण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे काही अचंबित करणा-या वेगळ्या महत्त्वाकांक्षा आपल्यापैकी ब-याच लोकांना असते. काही जणांना त्या पूर्णत्वास नेणेही साधते. तर काही आकांक्षा अपूर्णच राहतात. हे असले तरी या आकांक्षा मांडणे हासुद्धा एक आगळाच अनुभव असतो ना? चला तर मग, वेगळेपणाचे दर्शन घडवणा-या महत्त्वाकांक्षा मांडू या. येथे निखळ आनंद अपेक्षित आहे, कुणावरही कसलीही टिका करण्याचा उद्देश नाही. सर्वांनी हलकेच घ्यावे ह्या विनंतीसह सुरूवात माझ्यापासूनच करतो.
१. हिन्दी चित्रपटातील टपोरी गाणी भजनी ठेक्यावर घेणे.
२. पानवाल्याच्या आजूबाजूला टाकलेल्या पिंकांची छायाचित्रे मॉडर्न आर्ट म्हणून लिलावासाठी ठेवणे.
३. पुण्यातील खड्डयांमध्ये नौकायनाचे वर्ग चालवणे.
४. विरोप टेनिस (ई-मेल टेनिस) ह्या स्पर्धाप्रकारास ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळवून देणे. (टेनिस या खेळात जसे चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोटात टोलवायचा असतो तसेच कुठलीही जबाबदारी दुस-याच्या गळ्यात मारून कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारास विरोप टेनिस म्हणतात).
५. कुडमुड्या जोतिष्यांची समभाग बाजारामध्ये (शेअर मार्केट) वित्त विश्लेषणासाठी नियुक्ती करणे.
६. वाद्य हा वाजवण्याचा प्रकार नसून श्रोत्यांना छळायचे अमोघ शस्त्र आहे ह्या शोधास कृतीत आणणा-या संगितमल्लांना संगितरत्न पुरस्कार देणे.
७. धर्म ही अफूची गोळी असल्याचा प्रवाद आहे. त्यामुळे, राजकारणात अधिकृतरित्या अधर्म करण्याची अनुमती देणारा कायदा पारित करणे. (अवांतर – तशी कायद्याची आवश्यकता आहे का?)
८. किटकनाशकांना शीतपेये म्हणून घोषित करणे.
९. क्रिकेटमध्ये लगेचच बाद होण्याचा विक्रम करणा-या खेळाडूंसाठी काष्ठमहर्षी हा नविन पुरस्कार सुरू करणे. (काष्ठ म्हणजे म्हाता-याची काठी, ह्या महान खेळाडूंसाठी चेंडूफळी ही तशीही म्हाता-याच्या काठीसारखीच असते ना?)
१०. आकांक्षा क्र. ४, ७ आणि ९ च्या अनुषंगाने यापुढील लेखामध्ये कंसात व्याख्या लिहिण्याऐवजी संपूर्ण लेखच कंसात लिहिणे.
त्वरा करा, त्वरा करा आणि या संग्रहात आपणही भर घाला, ![]()
(शैलेश श. खांडेकर)
Filed under: हास्य | Tagged: हास्य | Leave a Comment »
शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण
![]()
[ Monday, November 05, 2007 05:01:14 am]
![]()
|
– म. टा. प्रतिनिधी शेअर माकेर्ट मेड इझी इन्स्टिट्यूटतफेर् शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता धुरु हॉल, छबिलदास स्कूलसमोर, दादर (पश्चिम) इथे होणार आहे. शेअर माकेर्ट आणि यातील ट्रेडिंगसंबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : मोबाइल नंबर : ९३२३१९३४४३, ९३२३१९३३४४ |
शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण
![]()
[ Monday, November 05, 2007 05:01:14 am]
![]()
|
शेअर माकेर्ट मेड इझी इन्स्टिट्यूटतफेर् शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता धुरु हॉल, छबिलदास स्कूलसमोर, दादर (पश्चिम) इथे होणार आहे. शेअर माकेर्ट आणि यातील ट्रेडिंगसंबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : मोबाइल नंबर : ९३२३१९३४४३, ९३२३१९३३४४ |
Filed under: marathi | Tagged: marathi | १ प्रतिक्रिया »
वाचानाची आवड असलेल्या लोकांसाठी काही ई-पुस्तके. मला ही स्क्रीनवर वाचण्यापेक्शा थोड्या-थोड्या पानांच्या प्रिंटाउट्स काढून वाचायला आवडतात.
Filed under: marathi | Tagged: marathi | Leave a Comment »

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स पहा. गूगल मॅप्सची नवीन “माय मॅप्स” सोय वापरून तयार केलेली ही यादी.
हे पहुन तुम्हाला ही असे काही करावेसे वाटले तर अधीक माहिती ईथे मिळेल.
sabhar http://chakaatya.blogspot.com/2007/05/uk.html
Filed under: marathi | Tagged: marathi | Leave a Comment »
संवाद तुटत चाललाय,मना मनातला.
कल्लोळ होतोय भावनांचा, मना मनातल्या.
कुठे जावे कळत नाही या मनाला.
शेवटी आपल्याच पायात घुटमळते आहे घेत शोध
मनातल्या मनाचा.
मन एक वसन, धारण केलेलं मिरवायचं तरी किती?
फ़ेकुन द्याव वाटल तरी संभाळाव किती?
मन नाजुकसा हार, जणु गुंफ़लेली मोत्याची माळ
तुटली जर ती तर जोडावी कशी?
मनात उरलाय फ़क्त आता खोलवर अंधार,
जाणिव भुयारात असल्याची,
त्यात उजेडाला पणती लावावी तरी कशी?
From http://sonalikavita.blogspot.com/
Filed under: मराठी कविता | 3 Comments »
माझा संवाद मनाशी,
मन कशात गुंतले
पश्चिमेच्या सावल्यांना,
अंतर नाही पुरले
====================
क्षितिजाच्या रेषेवर
संध्येचा लालीमा,
तुझ्या आठवाने येतो
गाली रक्तिमा.
====================
श्वासाश्वासाचे अंतर,
माझा भक्तीचा रे भाव,
फुले झाली ती निर्माल्य,
कसा मिळावा पायी ठाव
=======================
माझा संवाद स्वप्नांशी
स्वप्न मना लावी पिसे
हाय! शब्द रे मातला
स्वप्न व्हावे सत्य कसे?
========================
from http://sonalikavita.blogspot.com/
Filed under: चारोळ्या, charoli | Tagged: चारोळ्या | 2 Comments »
रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा?
रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ?
नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो,
रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ?
प्रेम खरे जरी मी शोधतो,
रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ?
पदरी आहे जरी निराशा,
रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा ?
वाहतात श्रद्धांजली (मला) का?
रोज प्रेत माझेच जाळतो मी असा कसा?
चाणक्य आहे जनता ही भोळी
रोज निती माझीच शिकवतो मी असा कसा?
http://aarya-chanakya.blogspot.com/
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | 2 Comments »
ह्ल्ली मी भांडत नाही,
असा तिचा ग्रह आहे,
खर सांगायचच झालं तर,
माझा तिच्याशी तह आहे.
Filed under: मराठी कविता, charoli | Tagged: charoli | Leave a Comment »
![]() |
![]() |
function CloseWindow() {window.close() }![]() |
Filed under: marathi | Tagged: marathi | Leave a Comment »
/955FC1DBEB32EFE765257389006AB13F/$FILE/5vkaaysangta.jpg)
Filed under: हास्यचित्रे | Tagged: ास्यचित्रे | Leave a Comment »
कविता
हा काळोखाचा रस्ता आपुला नाही
ही चिमणपाखरे तुझ्याविना, त्या दुनिया माहित नाही
हा काळोखाचा रस्ता आपुला नाही
दुष्काळ किती वर्षानुवर्षं आलेले
इतिहास बघा, उद्ध्वस्त सर्व झालेले
तरी हाती घेऊन नांगर बळिवंतांनी
कोरड्या भुईतून स्वर्ग उभे केलेले
येऊ दे किती दुष्काळ, कर्ज दुनियेचे
नवनवे शास्त्र घेऊन नव्या शेतीचे
हा सुखी करू संसार, उभारु राजा
आभाळ फक्त बरसू दे नक्षत्रांचे
हे राज्य उभे शेतीचे शेतकऱ्यांचे
प्रतिबिंब नसे जर अमुचे हित बघण्याचे
उथलून टाकू हे तख्त गड्या निमिषात
उठतील ज्वाळ भडकोनी या खेड्यांचे
द्या मरगळ झटकून दाही दिशांना द्वाही
हा काळोखाचा रस्ता आपुला नाही
- ना. धों. महानोर
Filed under: मराठी कविता | Tagged: कविता | Leave a Comment »

Filed under: हास्यचित्रे | Tagged: हास्यचित्रे - मंगेश त | Leave a Comment »
आता मराठीतुन ब्लॉग करणे किती सोपे झाले आहे, काय सांगु! मी खालिल दोन पद्धति वापरतो:
जर तुम्हाला हि माहिती फ़ायदेशिर ठरली आणि मराठी लिहीण्यात यश आले, तर मला जरूर कळवा. खाली एक कॉमेंट टाकली तरी छान. आणी काही प्रष्ण व अधिक माहिती असेल तरी पण विचारा – बिनधास्त!
From
Filed under: marathi | Tagged: marathi | Leave a Comment »
संपत आला प्रवास माझा, नावाड्या ने पार मला
खूप उन्हाची वाट चालले, दे माझा अंधार मला
फुकट आणसी, मोफत नेसी, दाम मागसी जगण्याचे
खिसे रिकमे करून जायचा कळला ना व्यवहार मला
पार्थिवतेचे तोडून बंधन उत्कटतेने मिठीत घे
जिवाशिवाची भेट घडू दे, देह जाहला भार मला
मनोमनी मी तुलाच वरले, नेई कृतान्ता हरुन मला
जगण्याशी हा संग रोजचा भासतसे व्यभिचार मला
हरेक जन्मी एकदाच का होते अपुली भेट सख्या ?
याही जन्मी आसुसले मी, ये मृत्यो, स्वीकार मला
किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | Leave a Comment »
All_India_Radio (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=135)
Aakashwani : All India Radio official Site
Geetgunjan (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=261)
Songs from marathi movies
Maaza_Gaane (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=138)
List of Marahi songs
Marathi_Baalageete (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=142)
Marathi songs for children
Marathi_Bhaktisangeet (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=141)
Marathi Bhaktigeete
Marathi_Gaani (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=140)
Marathi Song collection in Devanagari
Sadabahar_Marathi_Geete (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=139)
Marathi Songs for every mood.
Shabda_Shabda_Aathave (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=147)
Collection of mainly Manik Varma’s songs
Shatataraka (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=137)
Nice Collection of Marathi Songs
Spicy Mango (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=260)
Raapchik Marathi Remix by Nandu Bhende
Filed under: links | Tagged: links | Leave a Comment »
आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…
खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…
एक मैत्रीण त्यास हवी
चिडवून भांडायला
रुसवून मनवायला
सदोदित सोबतीला
त्या धुंद चांदरातीला
स्वप्न हे पूर्ण होण्याचं
स्वप्न मनी बाळगतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…
म्हणुन आज सखी तू ये ना
मनाला खुदकन हसू दे ना
स्वप्नातही तव रूप पाहून
मध्यरात्री ते उनाडतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | Leave a Comment »
नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती |
जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती ||
मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||
मी म्हणालो, काय रे बाबांनो… कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |
आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||
( तेवढ्यात एक गाढव मला म्हणाले…)
अगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय नाय |
माणुसच एक जोक आहे, मग शो बघण्याची गरजच काय? ||
कारण हल्लीची माणसं फक्त दिसायलाच माणुस दिसतात |
वरुन किर्तन, आतुन तमाशा, अशा प्रकारे वागतात ||
सुखाच्या मागे धावता धावता विवेक पडतो यांचा गहाण |
पाण्यात राहुनही माशाची भागत नाही जशी तहान ||
पैशाच्या मागे धावता धावता दमछाक होते यांची खुप |
वाटी वाटीने ओतले तरीही कमीच पडते यांना तुप ||
बायका आणि पोरांसाठी, चाले म्हणे हा खेळ |
ज्या देवाने घडवले यांना, त्या देवासाठी नसतो यांना वेळ ||
माण्सांच वागणं सरड्यासारखं, नेहमीच बदलत राहतं |
माणसांपेक्षा आज इमानदार गाढव, असं उदाहरण द्यावं लागतं ||
आम्ही गाढव, आम्ही गाढव आता अभिमानाने हे सांगतो |
म्हणुन तर माणुस दिसताच, खुप जोरजोरात हसतो ||
त्यांनी म्हटलं, मला पटलं, मी तिथुन निघुन जाणच बरं समजलं!
आता तरी विचार करा, आणि माणसासारखा व्यवहार करा!
Filed under: मराठी कविता, हास्यकविता ... | Tagged: हास्यकविता ... | 14 Comments »
आकाशभर आभाळ
डोळाभर साचल्यावर,
किंचित ओल्या पापण्या
थरथर कापल्या !
कापलेल्या पापण्यांमध्ये
ओले ढग विरघळले
नि सुखाच्या
सरी सररर धावल्या…!
……….. चक्रवर्ती
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | Leave a Comment »
मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबुत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत!
संवाद दोनच माणसांचा असतो. त्यांच्यात तिसरा माणुस आला ली त्याच्या गप्पा होतात.
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे…
म्हणुनच खडक झिजतात..
प्रवाह रुंदावत जातो..
पोरगी म्हणजे वा-याची झुळुक.. अंगावरुन जाते, अमाप सुख देऊन जाते पण तिला धरुन ठेवता येत नाही..
जाळायला काही नसलं की पेटलेली काडेसुध्दा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
शस्त्रक्रिया होण्यापुर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
घेणा-याच्या अपेक्षेपेक्षा देणा-याची ऐपत नेहमीच कमी असते.
बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण!
Filed under: सुविचार | Tagged: सुविचार | 5 Comments »
मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.
चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.
भिक्षा ही भिकार्याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे – यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.
आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. ‘जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या’ असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. ‘हे मी काय केले?’ असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ‘ द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?’
युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, ‘याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.’
यावर अर्जुन म्हणतो, ‘असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.’
अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने ‘द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल’ असे घोषित केले.
हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.
विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.
यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की ‘द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.’ यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की ‘एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.’
युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, ‘नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.’
यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही (असे माझे मत) तो उद्गारतो, ‘हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.’
द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही “श्री”चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. (ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.
असो. आता माझी टिप्पणीः
राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची आणि सहकार्यांची गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.
द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.
किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे – बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.
संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास – के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)
Filed under: विखुरलेले मोती | Tagged: विखुरलेले मोती | Leave a Comment »
रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील
आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल
आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल
आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील
रामाला वाटलं नव्हतं…..
रामाला वाटलं नव्हतं
वनवासात रावण सितेचे अपहरण करिल
तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ
उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील
आणि रावणाला मारल्यावर विजयादशमी साजरी होइल
रामाला वाटलं नव्हतं…..
रामाला वाटलं नव्हतं
आपल्या जन्मस्थळावरुन वाद होतील
लोक एकमेकांचे गळे कापतील.
आपल्या नावाने यात्रा निघतील
आणि लोक आपल्या नावाने मतं मागतील
रामाला वाटलं नव्हतं…..
रामाला असेही वाटलं नव्हतंकी
आपल्या अस्तित्वावरच कोणि शंका घेइल
आपल्याला कोणि दारुडा म्हणेल
आपल्या नावाचा काही लोकाना कनवाळा
तर काहिना एवढा तिटकारा येइल
रामाला तसे वाटले असते तर………
त्याने आपल्या जन्मस्थळाचा सातबारा करुन ठेवला असता
मातेची आज्ञा पाळुन वनवासाला गेला नसता
सितेचे अपहरण झाले नसते
तो द्रविड मुलुखात गेला नसता
त्याला हनुमान भेटला नसता
सेतु बांधला गेला नसता
रावण मेला नसता
दसरा साजरा झाला नसता
आणि लोकाना निवडणुकीला मुद्दा मिळाला नसता
फारतर लोकानी त्याला मात्यापित्याचे न ऐकल्याबद्दल मर्यादापुरुषोत्तम म्हटले नसते पण आर्यावर्ताच्या कल्याणासाठी रामाने हे पातक केले असते…
Filed under: मराठी कविता | Tagged: मराठी कविता | 2 Comments »
| मागोवा |
|
Filed under: नवा चित्रपट | Tagged: नवा चित्रपट marathi movie | Leave a Comment »
| मेजवानी ईसकाळ दीपोत्सवाची…
दिव्यांचा हा उत्सव ईसकाळवरही… |
Filed under: sakal | Tagged: sakal | Leave a Comment »
| अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय? |
|||
|
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »
लोक सांगतात,
४० हजार रुपयांचा कुठलातरी रॉयल पेण्ट लावला तर घर रंगबिरंगी दिसू लागते…
अरे यार,
४०० रुपयांची रॉयल स्टॅग पिऊन पाहा…
सगळं जग रंगबिरंगी दिसू लागेल!!!!
Filed under: हसा लेको | Tagged: हसा लेको | 2 Comments »
| पोलिसच ‘गुन्हेगार’ |
|||
|
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »
| ‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना! |
|||
|
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »